छोटे दुकानदार व पानठेले, हातठेले यांचेवर होणाऱ्या उठसूट शासकीय कारवाही विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

छोटे दुकानदार व पानठेले, हातठेले यांचेवर होणाऱ्या उठसूट शासकीय कारवाही विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात  सुगंधित तंबाखू विक्री व प्लास्टिक पिशवीच्या नावावर शासकीय अधिकारी उठसूट पानठेले, किराणा दुकान, कापड दुकान, लहान हातठेले, चिकन मटण विक्रेते यांचेवर कारवाही करीत आहेत. 

या कारवाहीमुळे अधिकतर लहान दुकानदार आर्थिकरित्या होरपळला जात असून अनेकांचा व्यवसाय बंद पडला आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदार्निर्हाच्या प्रश्नांसोबतच पाल्यांच्या शैक्षणिक भविष्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे. मनसे सुघंधित तंबाखू किंवा प्लास्टिक वापराचे समर्थन करीत नाही परंतु अश्या नाहक कारवाहीने लहान दुकानदारांना त्रास होत आहे. 


शासनाने हे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर बंदी घालावी अशी व होलसेल -मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाही करावी अशी मागणी घेऊन आज अनेक मनसेसैनिक  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.


चंद्रपूर जिल्ह्यातील गोर गरीब व्यापाऱ्यांवर प्रशासना द्वारे प्लास्टिक व गुटखाबंदी च्या नावावर चालान च्या माध्यमातून होत असलेली लूट थांबवावी या साठी शहर अध्यक्ष मनदिप रोडे  नगरसेवक सचिन भोयर, सूरज ठाकरे (जिल्हा अध्यक्ष , कामगार सेना ) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सुमित करपे, ईशान शेख, निखिल बजाईत, अनिकेत जिवाने, राहुल क्षीरसागर, नंदू आर्डे, देवानंद ठेंगणे, बाळा चंदनवार सहित असंख्य मनसेसैनिक उपस्थित होते.