ब्रेकींग न्यूज : अयोध्या प्रकरणी उद्या अंतिम निकालाचे वाचन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग न्यूज : अयोध्या प्रकरणी उद्या अंतिम निकालाचे वाचन

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :
प्रेस ट्रस्ट ऑफ़ इंडिया यांनी आज दिनांक 8नोव्हेंबर 2019 ला सायंकाळी 8:30वाजता जाहीर केलेल्या  माहितीनुसार उद्या दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी अयोध्येतील राम जन्मभूमी संबंधातील सरन्यायाधीश रंजन गोगोई हे आपल्या निकालाचे वाचन करणार असल्याचे कळले आहे. 
येत्या काही दिवसात निवृत्त होत असलेले सरन्यायाधीश रंजन गोगोई ह्यांनी आपल्या कार्यकाळात बहुप्रतीक्षित  विवादावर रोज सुनावणी घेऊन निर्णय घेतला असुन घेतलेल्या अंतिम निर्णयाची घोषणा उद्या सर्वोच्च न्यायालयात सकाळी 10:30 वाजल्यापासून वाचुन दाखविण्यात येणार आहे.

हा निकाल कोणत्याही पक्षकाराच्या बाजूने किंवा काहीही आला तरी हिंदु आणि मुस्लिम दोन्ही समुदायाने शांतता बाळगावी आणि देशातील बंधुभाव कायम राखावा असे आवाहन टीम खबरकट्टा तर्फे करण्यात येत आहे.