जिवती तालुक्यातील नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालूनच प्रवास - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती तालुक्यातील नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालूनच प्रवास

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जिवती - 

जिवती तालुक्यातील दोन मुख्य मार्ग माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मार्गी जागेवर झाडे झुडुपे, वेली वाढलेल्या आहेत. या झाडांच्या फाद्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. वळणाच्या ठिकाणी सामोरील वाहने दिसत नसल्याने अपघाताची भीती असते. साईडपट्ट्या नसल्याने समोरून वाहन आल्यावर वाहन कोणी खाली उतरावयाचे यावरूनही बऱ्याचदा वाद होतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुकाच्या हद्दीत असूनही गावात येण्या-जाण्यासाठी पुरेशा रुंदीचा रस्ता नसल्याने पाटण, जिवती तालुक्यातील नागरिकांना व कर्मचारी दररोज जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. -कंटू कोटनाके नागरिक, जिवती

जिवती तालुक्यातील नागरिकांना माणिकगड आणि भेंडावी या दोन्ही मुख्य मार्ग आहेत. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष होत आहे, परिणामी या रस्त्याचे आजवर एकदाही रुंदीकरण झालेले नाही. रुंदीकरणाअभावी या रस्त्यावरून प्रवास करताना स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.जिवती तालुक्याला या  सुविधांच्या बाबतीत भेदभाव करीत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जिवती तालुक्यातील जिवती ते गडचांदूर (माणिकगड मार्ग) आणि पाटण ते गडचांदूर (भेंडावी मार्ग)  या रस्त्याच्या देखभालीचा सार्वजनिक बांधकाम विभाग कडे असते. झाडे झुडुपे आणि वेली वाढल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यावर मोठी अडचण निर्माण होते.

जिवती ते गडचांदूर आणि गडचांदूर ते पाटण हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. कधीही अपघात होऊ शकतो. या रस्त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कडून दुर्लक्ष होतांना चित्र दिसत आहे.