‘राजीनामा’,अजित पवारांकडून उपमुख्यमंत्री पदाचा : राज्यात पुन्हा एकदा ‘भूकंप’ ! सरकार कोसळणार ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

‘राजीनामा’,अजित पवारांकडून उपमुख्यमंत्री पदाचा : राज्यात पुन्हा एकदा ‘भूकंप’ ! सरकार कोसळणार ?

Share This
आज उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी शक्यता आहे.
मात्र यापेक्षा धक्कादायक बातमी येते आहे ती म्हणजे अजित पवार सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार आहेत. आपण सक्रिय राजकारणातून संन्यास घेऊ या एका अटीवर अजित पवारांनी राजीनामा दिल्याची माहिती आता पुढे येत आहे.

खबरकट्टा / महाराष्ट्र :भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांनी अखेर आज (मंगळवारी) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीशी फारकत घेवुन अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. गटनेते पदाच्या निवडीसाठी दिलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वाक्षर्‍यांच्या पत्राचा वापर सत्तास्थापनेसाठी केला गेला असा आरोप देखील करण्यात आला.


शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात शनिवारी याचिका दाखल केली. याचिकेवर रविवारी, सोमवारी आणि आज (मंगळवार) सुनावणी झाली. आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. सुप्रीम कोर्टानं उद्या (बुधवार) सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजपाला बहुमत सिध्द करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. दरम्यान, अजित पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांकडून करण्यात आले. त्यामध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. अजित पवारांचे मन वळविण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार यांनी देखील प्रयत्न केले. अखेर अजित पवार यांनी राजकीय परिस्थिती ओळखून तसेच कुटूंबाचे महत्व लक्षात घेवुन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे.