ॲड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला आम आदमी पार्टीत प्रवेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ॲड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला आम आदमी पार्टीत प्रवेश

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :सिंदेवाही तालुका प्रतिनिधी -
आम आदमी पार्टीच्या राज्य सदस्या ॲड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हयातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.  या सर्व कार्यकर्त्यांना आम आदमी पार्टीची टोपी लावून, त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे प्रस्ताविकेचे  वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन अनिल मडावी  यांनी केले.

आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने आज संविधान दिनांचा व आम आदमी पार्टीच्या स्थापन दिनांचा कार्यक्रम घेण्यात आला.  अध्यक्षस्थानी पक्षाचे लोकसभा अध्यक्ष मनोहर पवार होते.  या कार्यक्रमात मूल, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, नागभीड तालुक्यातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाची विचारसरणीने आणि दिल्ली सरकारच्या कामाने प्रभावीत होवून, पक्षात प्रवेश घेतला.  यापुढे प्रत्येक गावात आणि घरात आम आदमी पार्टीचा प्रसार करण्यांचे जाहीर केले.

यावेळी आम आदमी पार्टीचे स्थानिक पदाधिकारी, श्रमिक एल्गारचे अध्यक्ष राजेश्वर सहारे, सिंदेवाही तालुका अध्यक्ष शशीकांत बतकमवार यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवेश घेणाऱ्यात प्रामुख्याने थानेश्वर दिवटे, मेंडकी, प्रमोद चौधरी गांगलवाडी, भोजराज धोटे बरडकिन्ही, प्रकाश म्हशाखेत्री गांगलवाडी, जयराम ढोरे निलज, सुनिल गणवीर फिस्कुटी, पांडूरंग मुनघाटे चांदापूर, प्रकाश वटटे कवठी, शुभम येरमे चिटकी, प्रमोद येवनकर सिंदेवाही, प्रविण मोहुर्ले सिंदेवाही, केशव झरकर हिरापूर, गजानन कोहळे कापसी यांचा समावेश आहे.