राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी चंद्रपूर चा सहा खेळाडूंची निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी चंद्रपूर चा सहा खेळाडूंची निवड

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
तिरुपती आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स कनिष्ठ गट स्पर्धेत सहभागी होण्याकरीत चंद्रपूर चे खेळाडू सज्ज झाले असून ही स्पर्धे दिनांक 22 ते 25 नोव्हेम्बर 2019 दरम्यान तिरुपती येथील व्यंकटेश्वरा विद्यापीठ मैदानात संपन्न होणार आहे.
चंद्रपूरचे प्रतिनिधित्व करीत 16 वर्षा आतील स्पर्धेत सैफ शेख 100 मीटर धावणे, स्मुती आत्राम गोळा फेक, साक्षी सिरिकोंडा थाळी फेक, गौरी आसुटकर 100 हर्डल तर 14 वर्षा आतील स्पर्धेत साक्षी आत्राम गोळा फेक  क्रीडा प्रकारात श्री मयूर खेरकर यांचा मार्गदर्शनात सहभागी होणार आहे.

संघ 21 नोव्हेम्बर ला स्पर्धे साठी रवाना होणार असून चंद्रपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष डॉ दिलीप जयस्वाल, सचिव श्री सुरेश अडपेवार, कु पुर्वा खेरकर, कु संगीता बांबोडे, श्री रोशन भुजाडे, भास्कर फरकाडे यांनी खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.