ताडोबा मोहुर्ली प्रवेशद्वाराजवळ हत्तीने राखणदाराला चिरडून केले ठार : वनविभागात खळबळ : पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बदलला मार्ग : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ताडोबा मोहुर्ली प्रवेशद्वाराजवळ हत्तीने राखणदाराला चिरडून केले ठार : वनविभागात खळबळ : पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बदलला मार्ग :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी आणण्यात आलेला हत्ती नियंत्रणाबाहेर जाऊन देखरेख करणाऱ्या माहूत जानकीराम मसराम याला जागीच चिरडून ठार केले.ही घटना ताडोबाचं प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गेटवर घडली. या घटनेमुळं वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.


वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुःखद घटना घडली,व्याघ्र दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना हत्ती सफारीचा आनंद घेण्यासाठी वनविभागाने मोहूर्ली येथील मुख्य प्रवेशद्वारावर हत्ती सफारी सुरू केली होती, यात हा गणेश नावाचा हत्ती होता.मिळालेल्या माहितीवरून 1 नर 2 मादा असे 3 हत्ती मोहूर्लीच्या मुख्य प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहे हे पर्यटकांना सफारी घडवून आणतात, मृतक माहूत जानकीराम मसराम हा या हत्तींची देखरेख व चारापाणी करतो, अशातच गणेश हत्ती  चवताळला व नियमित चारापाणी करणाऱ्या माहूत जानकीराम मसराम वर हल्ला करत ठार केले.पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बदलावा लागला मार्ग -तर दुपारच्या सफारीवर जाणाऱ्या सर्व पर्यटकांना या घटनेची खबर  न लागू देत  वनविभागाने  जिप्सी व सर्व पर्यटन वाहने  या खुटवंडा गेटवरून वळवल्या त्यामुळे पर्यटकांना देखील विचार करावा लागला की नियमित मोहूर्ली प्रवेशद्वारावर  वरून येणाऱ्या गाड्या आज खुटवंडा गेटवरून कशा काय परत येत आहे? या कारणामुळे सर्व पर्यटक चिंतेत होते. मात्र परत मोहुर्ली प्रवेशद्वारावर सर्व वाहने  येताच हा प्रकार सर्व पर्यटकांना माहित झाला.या घटनेनंतर संपूर्ण मोहूर्ली गावात दहशतीचे तसेच दुःखाचे वातावरण निर्माण झालेले आहे.