अखेर मुतदेहच सापडला : चार दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी हरविल्याची केली होती तक्रार : देहस्थिती वरून घातपाताची पूर्ण शक्यता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर मुतदेहच सापडला : चार दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी हरविल्याची केली होती तक्रार : देहस्थिती वरून घातपाताची पूर्ण शक्यता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

बल्लारपूर पोलीस ठाण्यात चार दिवस अगोदर दादाभाई वॉर्ड येथिल रहिवासी अस्लम शेख गेधू मिया शेख उर्फ अस्लम भाई वय 50 वर्षे हे अचानक हरविल्याची तक्रार बल्लारपूर पोलिसात दाखल करण्यात आली होती,मात्र शुक्रवारी सायंकाळी 8 चे दरम्यान विसापूर येथून आपल्या दुचाकीने बल्लारपूर ला आपल्या घरी निघाल्या नंतर तो पुन्हा घरी परतलाच नव्हता.

आज सोमवारी ला सकाळी काही लोकांना बल्लारपूर विसापूर रोड वरील पेपर मिल मागील भागात एका खोल नालीत त्याचा मुत्युदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे.धारदार शस्त्रांनी त्याच्या व दगडांनी ठेचून त्याची हत्या केली असावी असा कयास लावल्या जात आहे.दरम्यान त्याच्या मोबाईल चे शेवटचे लोकेशन धोपटला कॉलरी परिसरात दाखविल्याचे बोलले जात असून,त्याची दुचाकीही अद्याप पोलिसांना मिळाली नाही.

महत्वाचे म्हणजे असलंम हा विसापूर येथे सट्टा चालवायचा.तो विसापूर येथून निघाल्यावर घरी न परतल्याने घर परिवार व इस्टमित्रानि परिसरात तील सगळी कडे शोध घेतला होता पण त्याचा मृतदेह गेली चार दिवसा पासून कोठेही मिळाला नाही,दरम्यान शव विच्छेदन अहवाला नंतर बऱ्याच बाबी स्पष्ट होणार असून,बल्लारपूर पोलिसांसमोर या मर्डर मिस्ट्री चा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.