"ती" महत्वाची पदे शिवसेनेला मिळणार नाहीत : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"ती" महत्वाची पदे शिवसेनेला मिळणार नाहीत : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना !

Share This
खबरकट्टा /मुंबई  : 


शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेनेकडून खा. संजय राऊत यांच्यातर्फे रोज वेगवेगळी आक्रमक विधाने केली जात आहेत. संजय राऊत यांच्या विधानांवर भाजप नेते सावधगिरीने प्रतिक्रिया देत आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १२ दिवस झाले तरीही सरकार कोणाचे बनणार हे निश्चित होत नाहीये. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री व गृहमंत्री पद देण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता शिवसेना कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

वास्तविक या भेटीमध्ये महाराष्ट्रात सुरु असलेल्या ओल्या दुष्काळाविषयी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले असले तरी राज्यातील सत्तासमीकरणाविषयी चर्चा झाली असल्याचे त्यांनी उघड केले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद देण्यास अमित शाह यांचा नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांचा शपविधी ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी होणार  असल्याची माहिती समोर येत होती. पण भाजप – शिवसेनेतील तिढा अद्याप कायम असल्याने या दिवशी शपथविधी होणार नसल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदासंदर्भात शिवसेनेशी चर्चा झालीच नसल्याचा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला. आता शिवसेना कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.