गोंड़पिपरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची राष्ट्रवादी युवक कांग्रेस ची मागणी* - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंड़पिपरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची राष्ट्रवादी युवक कांग्रेस ची मागणी*

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी प्रतिनिधी -


यंदा परतीच्या पावसाने कहरच केला.ऑगस्ट महिन्यात गोंड़पिपरी तालुक्यात अतिवृष्टि झाली.परतीच्या पावसाने शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.शाशनाने तात्काळ नुकसाणाचे पंचनामे करून मदतिचा हात द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे तहसिलदार यांना निवेदन देऊन करन्यात आली.

      
गोंड़पिपरि तालुक्यात 70 टक्के लोक ही शेती वर अवलंबुन आहे. मुख्य व्यवसाय शेती असून आज शेतकरी संकटात सापडला आहे.शेकडो हेक्टर पिकांची नुकसान झाले  त्यात सोयाबीन, धान,कापूस,तुरी आदि पिकांचा समावेश आहे.निसर्गाच्या लहरिपनाचा फटका धान कापसाला बसला.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस सुरु आहे.धान कुजन्याच्या स्थिथित आहे.त्यामुळे स्वतंत्र पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व गोंड़पिपरि तालुका ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सूरज माडूरवार यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून केलि आहे.यावेळी सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष नितेश मेश्राम, युवक तालुका उपाध्यक्ष निकेश बोरकुटे,विवेक धूड़से, पंकज भोयर,अभिषेख पुप्पलवार,सूरज भोयर,आशिष मुंजनकर,भास्कर ताजने उपस्तित होते.