शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार... - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार...

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : औरंगाबाद 

भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून फसवणूक केल्याचे तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे (वय-34,रा.बेगमपुरा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रत्नाकर चौरे यांनी केली आहे.