शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे दिलासा :सिंचनाची समस्या मिटणार - आशिष ताजने यांचा यशस्वी पाठपुरावा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे दिलासा :सिंचनाची समस्या मिटणार - आशिष ताजने यांचा यशस्वी पाठपुरावा

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -
            
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील नारंडा ते पिपरी रस्त्यावरील चंद्रभान तिखट यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर गेल्या एक महिण्यापासून खराब होते,ते भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून बसविण्यात आले आहे.
                   
नारंडा येथे मागील एक महिन्यापासून चंद्रभान तिखट यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर खराब झाले होते,त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी अडचण निर्माण होत होती,शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन हे पिक काढले असून आता चना व गहू  पेरणीकरीता व काही शेतकऱ्यांना कपासी पिकांना सिंचन करणे आवश्यक होते,पंरतु ट्रान्सफॉर्मर खराब असल्यामुळे सिंचन करता येत नव्हते. 
त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याच्या मार्गावर होते,त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी सदर बाब ही भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिली, त्याअनुषंगाने भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे  गडचांदूर येथील उपविभागीय अभियंता श्री.इंदूरकर सर व कार्यकारी अभियंता श्री.तेलंग सर यांच्याशी चर्चा करून सदर समस्या त्यांच्या लक्षात आणून दिली व नवीन ट्रासफार्मर मिळण्यासाठी पाठपुरावा केला त्यांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नारंडा येथे नवीन ट्रासफार्मर बसविण्यात आला आहे.
      
त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या मिटणार आहे,तसेच त्यांना आता सिंचन करता येणार आहे,नवीन ट्रासफार्मर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
      
यावेळी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,नारंडा उपसरपंच अनिल शेंडे,विलास पावडे,सत्यवान चामाटे,अजय तिखट,मनोज तिखट,गोविंदा चाहरे व शेतकरी उपस्थित होते.