आदर्श शाळेत बालकदिन उत्साहात साजरा : बालक दीना नीमीत्य कथाकथण स्पर्धेचे आयोजन. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत बालकदिन उत्साहात साजरा : बालक दीना नीमीत्य कथाकथण स्पर्धेचे आयोजन.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा 14 नोव्हेंबर -

आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल च्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालक दिन व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर हे होते. प्रमुख अतिथि म्हणून आदर्श प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे ,पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले,स्पर्धेचे परीक्षक संतोष वडस्कर ,अंजली चटकि यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कथाकथन स्पर्धेत पहिला क्रमांक भाग्यश्री लोढे ,द्वितीय चैताली नीमकर ,त्रुतीय अर्शिया प्ररविन या विध्यार्थीनी पटकविला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सावि येसेकर हिने केले.आभार रोशनी जाधव हिने मानले.कार्यक्रमाच्या यशवितेकरिता इयत्ता सहावी च्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.