विचित्र घटना : पीठाच्या चक्कीत ओढल्या गेल्याने व्यक्तीचे मुंडके व धड वेगवेगळे होऊन थरारक मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विचित्र घटना : पीठाच्या चक्कीत ओढल्या गेल्याने व्यक्तीचे मुंडके व धड वेगवेगळे होऊन थरारक मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती प्रतिनिधी 

महिलांचे पदर विविध ठिकाणी अडकून झालेले अपघात अनेकांनी पाहिले,अनुभवले,ऐकले मात्र चक्क पिठाच्या चक्कीत अडकून अपघात झाल्याची घटना जिवतीतील हिमायतनगर येथे बुधवारला दि. 30/10/2019 ला सायंकाळच्या सुमारास घडली आहे.


याबत दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार श्री.गंगाधर रामजी नलबले ( वय -65 रा.हिमायतनगर जिवती ) असे अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीचे नाव आहे,पीठ दळण्याच्या चक्कीत त्यांच्याच गळ्यातील दुपट्टा ओढला गेल्याने त्यांचे मुंडके व  धड अलग होऊन जागीच मृत्यू झाला आहे.त्यांच्या मागे तीन मुले व वयस्क पत्नी आहे. पुढील तपास टेकमांडवा  पोलीस अधिकारी करत आहेत.