तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत पालडोह शाळा अव्वल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत पालडोह शाळा अव्वल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर-  जिवती /संतोष इंद्राळे -


गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे काल पार पडलेल्या तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोह येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करतांना प्राथमिक व प्राथमिक विभागात एकूण 4  तर 6  द्वितीय असे 10 बक्षिसे पटकावली.


प्राथमिक गट
1) वाद - विवाद : : दिव्या राहुल केंद्रे- प्रथम 
2)स्वयंस्फुर्त लेखन : : विकी पवार - प्रथम 
3) सुंदर हस्ताक्षर : : अविद्या पवार - प्रथम 
4)स्वयंस्फुर्त भाषण : : विकी अंकुश पवार - द्वितीय 

उच्च प्राथमिक गट
1) स्वयंस्फुर्त भाषण : : मीरा नागेश पांचाळ - प्रथम 
2) एकपत्री अभिनय : : शिवानी देवकते - द्वितीय 
3) सुंदर हस्ताक्षर : : वैष्णवी बबन चौधरी - द्वितीय 
4) चित्रकला : : युवराज अंकुश पवार - द्वितीय 
5) स्मरणशक्ती : : काजल सोपान राऊतवाड - द्वितीय
6) बुद्धिमापन : : सिद्धेश्वर सखाराम हुगे - द्वितीय 

    
शाळेत पारितोषिक विजेत्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला,त्यासाठी शालेय व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.केरबा बाजगिरे मु.अ.राजेंद्र परतेकी तर श्री.राजगिरे,कूचनकर,पानघाटे सगळाम,दिपक गोतावळे इत्यादी स.शि.उपस्थित होते. शिक्षण तज्ञ सिद्धेश्वर कणकावरे हे सर्व जण पार पडलेल्या कार्यक्रमास हजर होते,श्री.बागडे,संवर्ग विकास अधिकारी श्री.सचिन मालवी, कें.प्र.श्री.कोहपरे यांनी शाळेचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या वाटचालीस सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.