राजुरा विधासभा क्षेत्रातील वैद्यकीय व्यवस्था तत्काळ सुधारावी : मनसे नेते सूरज ठाकरे यांची जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा विधासभा क्षेत्रातील वैद्यकीय व्यवस्था तत्काळ सुधारावी : मनसे नेते सूरज ठाकरे यांची जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व गडचांदूर येथील आरोग्य-वैद्यकीय व्यवस्था ठेपाळली असून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना या अन्यायकारक व्यवस्थेचे बळी ठरत आहेत. 


दोन दिवसांपूर्वी राजुरा ग्रामीण रुग्णालयात अडीच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यूला वैद्यकीय अधिकारी व परीचारिकांचा बेजवाबदार पणा कारक असून ह्या प्रकरणाची संबंधितांवर कडक कारवाही करण्याची मागणी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना लेखी स्वरूपात केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

रिया मडावी या अडीच वर्षीय बालिकेच्या मुर्त्यूची माहिती समजताच, मृत्यूसंबंधात माहिती मागण्यासंबंधात राजुरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांकडे गेलो असता, उलट त्यांनीच  राजुरा पोलीस निरीक्षकांना अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याला महिती मागण्याचा अधिकार सामान्यांना आहे परंतु अश्या प्रकारे गरज नसताना जातीय कायदा सुविधेच्या आड लपून मनमानी कारभार चालविणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो - सुरज ठाकरे,मनसे, चंद्रपूर. 

सोबतच राजुरा-बामणी मार्गावरील निर्माणाधिन पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक परवानगी नाकारावि व राजुरा शहरातील बंद असलेले  ट्राफिक सिग्नल 15 दिवसाचे आत दुरुस्त करण्यात यावे अथवा मनसे वाहतूक सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असेही पत्रकार परिषदेत कळविले.