गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकि, कर्जबाजारीपणाने उचलले पाऊल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकि, कर्जबाजारीपणाने उचलले पाऊल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
 


जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगारपेठ येथिल शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करुन जिवन संपविले. रघुनाथ बालाजी चिताडे वय 40 असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. नापिकी, कर्जबाजारीमुळे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

गोंडपिपरी तालूक्यातील भंगारपेठ येथील रहिवासी रघुनाथ चिताडे यांनी आपल्या राहत्या घरी गुरवारला कुटुंबीय झोपले असताना किटकनाशक प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटूंबियानी विचारपूस केली असता विषप्राशन केल्याचे समोर आले. गोंडपिपरी पोलीस आणि गावकर्यांचा मदतीने चिताडे यांना ग्रामीण रुंग्णालय गोंडपिपरी येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभिर असल्याने उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. 

काल रात्री 12.30 वाजता उपचारा दरम्यान चिताडे यांची प्राणज्योत मावळली. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. रघुनाथ चिथाडे यांच्यावर एक लाख 20 हजार रुपयाचे कर्ज होते अशी माहीती आहे. पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे करीत आहे.