शिवसेना भाजप सोबत सरकार मध्ये सामील होण्यास तयार? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना भाजप सोबत सरकार मध्ये सामील होण्यास तयार?

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे, अश्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले ह्यांनी महत्वपूर्ण विधान केलेलं आहे.

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटतांना दिसतो आहे, रिपाई ( आठवले )​ गटाचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. रामदास आठवले म्हणाले की, शिवसेना भाजप सोबत सरकार मध्ये सामील होण्यास तयार असून नवीन फॉर्म्युला वर चर्चा केल्या जाणार आहे.

रामदास आठवले म्हणाले की, 'आज मी शिवसेना नेते संजय राऊत ह्यांच्याशी सरकार बनवण्यासंबंधी चर्चा केली असता संजय राऊत भाजप सोबत सरकार बनवण्यास अनुकूल आहेत. तसेच, 3 वर्ष भाजपचा तर 2 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री या फॉर्म्युला वर विचार करणार असल्याचे संजय राऊतांनी आपणास सांगितले असल्याचे रामदास आठवले ह्यांनी कबूल केले आहे.रामदास आठवले म्हणाले की, 'सरतेशेवटी महाराष्ट्रात भाजप - शिवसेना महायुतीचचं सरकार होणार आहे'.

रामदास आठवले ह्यांनी आज भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा ह्यांची भेट घेतली असता, महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेविषयी चर्चा केली, या दरम्यान अमित शहांनी 'महाराष्ट्रात भाजप - सेनेचंच सरकार स्थापन होणार असल्याचा' विश्वास आपल्याला दिला आहे अशी माहिती रामदास आठवलेंनी दिलेली आहे.

या दरम्यान शिवसेना - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू आहे, मात्र अद्यापही तिन्ही पक्ष बहुमत सिद्ध करू शकलेले नाही आहेत.

दरम्यान आजच शरद पवार यांनी पत्रकारांना उत्तर देताना सत्ता स्थापनेबद्दल भाजपा-शिवसेना यांना विचारा असे विधान केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.