सलग तिसऱ्यांदा बाळकृष्ण काकडे यांची आवाळपुरच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सलग तिसऱ्यांदा बाळकृष्ण काकडे यांची आवाळपुरच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

        
कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लगत आवाळपुर गावात तीन वर्षांपासून बाळकृष्ण काकडे यांचे काम, गावात शांतता ठेवण्यासाठी केलेली धदपड बघून आज ग्रामपंचायत आवाळपुर मार्फत विशेष ग्रामसभा आयोजित करून तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा बाळकृष्ण काकडे यांची निवड ग्रामसभेत एकमताने मंजूर केली.


गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून शासनाने गाव तंटामुक्ती सामितीची स्थापना केली.