विनोद गेडाम यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राजुरा तालुकाध्यक्ष पदी निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विनोद गेडाम यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राजुरा तालुकाध्यक्ष पदी निवड

Share This
खबरकट्टा : चंद्रपूर -राजुरा काल दिनांक 3 नोव्हेंबर ला अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची कार्यकारी सभा साने गुरुजी सभागृह राजुरा येथे पार पडली. 

या सभेत प्रमोद बोरिकर,अखिल भारतिय आदिवासी विकास परिषद चे जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून,  विनोद गेडाम यांची तालुका अध्यक्ष,मनोज आत्राम यांची महासचिव म्हणून सर्वानुमते निवड करून प्रपत्र देण्यात आले.त्याचबरोबर अनेक आदिवासी समाजविषयक अनेक सामाजिक प्रश्न व आपली भूमिका या वर चर्चा करण्यात आली.या प्रसंगी आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वाघुजी गेडाम,  कृष्णाभाऊ मसराम,जिल्हा युवा अध्यक्ष चंद्रपुर ,महिपाल मडावी जिल्हासचिव, अकुंश कुडमेथे ,तालुका कार्यध्यक्ष राजुरा,नितीन सिडाम व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.