वेकोलि कर्मचाऱ्याचा रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोलि कर्मचाऱ्याचा रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी मंगळवारी रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबून वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील महाकाली कॉलरी येथे घडली आहे.

            

                 

माधव कोपुलवार वय 53 वर्षे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार माधव कोपुलवार हे सकाळच्या पाळीत कर्तव्यावर होते.मात्र अचानक रेतीचा ढिगारा कोसळला आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती इतर कामगारांना मिळताच त्यांनी मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढला.यानंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी पोहोचून जमावाला शांत केले.मात्र या घटनेने वेकोलि कर्मचाऱ्यात व माधव कोपुलवार यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.