स्मार्ट ग्रामपंचायतीचा स्मार्ट निर्णय :मृत व्यक्तीच्या गरजू कुटुंबाला त्वरित तीन हजार रुपये देणार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्मार्ट ग्रामपंचायतीचा स्मार्ट निर्णय :मृत व्यक्तीच्या गरजू कुटुंबाला त्वरित तीन हजार रुपये देणार

Share This
जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीचा महत्त्वपूर्ण निर्णय-खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना :- कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबीच्या वतीने २६ नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


      
ज्यांच्या घरी मयत होईल त्यांच्या कुटुंबाला अंत्यविधीसाठी त्वरित तीन हजार रुपये मिळणार असून ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेल्या शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएम मधून मोफत थंड व शुद्ध पाणी सुद्धा देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

         अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू अचानक येतो. अनेक लोकांकडे अचानक आलेल्या मृत्यूमुळे अंत्यविधीकरिता खर्चासाठी पैसे राहत नाही. अशावेळी घरी दुःखाचं वातावरण असताना इतरांना पैशाची मदत मागून अंत्यविधी पूर्ण करण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येतात. अशावेळी अल्पशी मदत सुद्धा त्या कुटुंबासाठी मोलाची ठरते-श्री. आशिष देरकर, उपसरपंच, बीबी, ता.कोरपना 

त्यामुळे ग्रामपंचायत बिबीच्या वतीने गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.) व गेडामगुडा या पाचही गावातील कुटुंबांना या योजनेंतर्गत मदत देण्यात येणार असल्याचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले.