वृद्धापकाळ आणि भुकेने व्याकूळ होऊन वाघिणीचा मृत्यू : दोन महिन्यात तीन वाघांचा मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वृद्धापकाळ आणि भुकेने व्याकूळ होऊन वाघिणीचा मृत्यू : दोन महिन्यात तीन वाघांचा मृत्यू

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : गोंडपिपरी -

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात येणाऱ्या लाठी वनक्षेत्रात वाघीण मृतावस्थेत आढळली होती. वृद्धापकाळ आणि भुकेने व्याकूळ होऊन वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत वाघिणीचा मृतदेह चंद्रपूरला हलविण्यात आला. आज (ता 27) शवविच्छेदन करण्यात आले.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबाअंतर्गत येणाऱ्या लाठी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 559 मध्ये वाघीण मृतावस्थेत आढळली होती. वाघीण रोपवाटिकेच्या एका टोकावर असलेल्या नाल्याच्या काठावर धापा टाकत होती. घटनेची माहिती वनविभागाच्या बचाव पथकाला देण्यात आली. परंतु बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच वाघिणीचा मृत्यू झाला होता. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत होते. 

दोन महिन्यात तीन वाघांचा मृत्यू :

वाघांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ असुरक्षित झाले काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. जिल्ह्यात अवघ्या दोन महिन्यात तीन वाघांचा मृत्यू झाला आहे. गोंडपिपरी तालुक्‍यात दोन तर भद्रावती तालुक्‍यात एका वाघाचा मृत्यू झाला. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर आता शंका उपस्थित केली जात आहे.