ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मिरवणूक, कोरपना तालुक्यामध्ये ईद ए.मिलाद उत्साहात साजरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मिरवणूक, कोरपना तालुक्यामध्ये ईद ए.मिलाद उत्साहात साजरी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त कोरपना तालुक्यातील बिबी, नांदा, गडचांदुर, कोरपना या शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात सर्व शहराच्या मशीदीपासून झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरुन फिरुन मिरवणूक वापस मशीदीमध्ये पोहोचली. मिरवणुकीमध्ये कुठलेही वाद्य वाजवण्यात आले नाही. अतिशय शांततेत उत्सव पार पडला. नबीका दामन नही छोडेंगे, अशा घोषणा देण्यात आल्या. हजरत मोहम्मद पैंगबर यांनी जगाला दिलेली शांती आणी.मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक  व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा या मागील उद्देश असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

तसेच           मिरवणुकीदरम्यान बिबी मध्ये  मुख्य मार्गावर मुस्लिम पिंजारा कमेटी,नुरानी संदल कमेटी तर्फे खिर ,मिठाई ,शरबतचे  वाटप करण्यात आले. मिरवणुकीच्या सांगताप्रसंगी आलाहजरत  मशीदीचे इमाम यांनी  हजरत मोहंमद.पैंगबर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. मिरवणुकीसाठी आलाहजरत मशीद पंच कमिटी , नुरानी युवा मंडळांचे.कार्यकरते हबीब शेख, अक्रम शेख, इरशाद शेख, रहीम शेख, अफरोज शेख, वसीम शेख आदीनी       परिश्रम घेतले. पोलिसांचा चोख बंदोबस्त  ठेवण्यात आला होता.