रक्तदान हेच महादान :रक्तदान करून वाढदिवस साजरा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रक्तदान हेच महादान :रक्तदान करून वाढदिवस साजरा

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे पण मानवाला उपयुक्त रक्ताचे संशोधन करू शकला नाही. त्यामुळे रक्तदान श्रेष्ठदान म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय आज आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात वॉर्ड नंबर १ मध्ये गणेश सुखदेव कोंडेकर या रुग्णास १ युनिट ब्लडची आवश्यकता होती. ही बाब जितेंद्र मशारकर यांना समजताच त्यांनी जिल्हा रुग्णालय गाठून रक्तदान केले. दैनिक महासागरचे जिल्हा प्रतिनिधी श्री. जितेंद्र मशारकर सर यांनी आज ५४ वेळा रक्तदान करण्याचे महान कार्य पूर्ण केले.त्यांच्या कार्यास सलाम -
सोबतच जिल्हा रक्त संक्रमण विभागातील अधिकारी श्री. जयसिंग डोंगरे व श्री. जितेंद्र मशारकर सर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे सर, डॉ. स्वप्नील गेहलोत, EARS चे प्रेसिडेंट सौरभ डोंगरे व टीम सदस्य उपस्थित होते.