मोबाईल खरेदी कर्जाचे हप्ते वसूल करण्यास गेलेल्या एजन्ट वर ग्राहकाचा चाकूने वार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोबाईल खरेदी कर्जाचे हप्ते वसूल करण्यास गेलेल्या एजन्ट वर ग्राहकाचा चाकूने वार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड -
               
नागभीड तालुक्यातील कोर्धा येथील योगेश नेताजी गायधने याने सम्यक फायनस कंपनी कडून मोबाईल खरेदीसाठी कर्ज घेतले होते. कंपनीचा अभिकर्ता(एजन्ट ) वसुलीसाठी अरविंद प्रभाकर भादककर व उत्तम मेश्राम  काल दिनांक 2 नोव्हेंबर ला  रात्री6 वाजता घरी गेला असता उद्या 3नोव्हेंबर ला येऊन हप्ते थकबाकी रक्कम घेऊन जाण्यास  सांगितले. 

त्यानतंर आज दुपारी वसुलीसाठी नवेगाव पांडव येथे बोलाविले नंतर कोसंबी गवळी येथे घेऊन गेले  परत येत असताना रस्त्यावर चालू दुचाकी वर मानेवर चाकूने उत्तम मेश्राम यांचेवर वार केला जात असताना वाहन चालकाने योगेश गायधनेला रंगेहाथ पकडले. तात्काळ उत्तम मेश्राम यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले  असता गंभीर स्थिती लक्षात घेऊन त्यांना नागपुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले.वाहन चालक अरविंद भादककर याने नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. 

एरव्ही अनेक कंपन्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतात आणि वसुलीसाठी स्थानिक पातळीवर अभिकर्ता (एजन्ट ) नेमणूक करून वसुली करीत आहेत. योगेश गायधने यांचेवर9800/रुपये बाकी सम्यक फायनान्स  कंपनीने  सांगितले आहे. या गंभीर प्रकरणी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून योगेश गायधने सध्या फरार आहे. यामुळें कर्ज वसुलीसाठी जाणाऱ्यावर हल्ला चढविला जात असेल तर कर्ज उपलब्ध करून देणाऱ्याचे धाबे दणाणले आहे. अधिक पोलीस तपास सुरू करीत आहे त्यानंतरच जे काही आहे ते समोर येईल सध्यातरी वसुलीसाठी जाणाऱ्यावर चाकूने हल्ला केला ही नागभीड पोलीस स्टेशन मधील पहिली घटना घडली आहे.