गाव हेच खरे सर्वोच्च विद्यापीठ ! - देवाजी तोफा : घाटकुळ येथे फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक 'दिव्यग्राम २०१९ महोत्सव' - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गाव हेच खरे सर्वोच्च विद्यापीठ ! - देवाजी तोफा : घाटकुळ येथे फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक 'दिव्यग्राम २०१९ महोत्सव'

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :पोंभुर्णा -

                  
गावात जे अनुभवातून आणि कृतीतून शिक्षण मिळते, ते इतर कुठल्याच विद्यापिठात मिळत नाही. गावात सर्व शास्त्र आहेत, त्यातच शिक्षणशास्त्र आहे. जगाला शिकण्यासाठी व प्रेरणा घेण्यासाठी गाव हेच खरे सर्वोच्च विद्यापीठ आहे. असे प्रतिपादन लेखामेंढा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी केले. युवा जनहित बहुउद्देशिय संस्था घाटकुळ आयोजित 'दिव्यग्राम २०१९' कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 


कार्यक्रमाचे उद्घाटन पं.सं.उपसभापती विनोद देशमुख  यांनी केले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रिती मेदाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, पोलीस पाटील अशोक पाल, अॅड.किरण पाल, विठ्ठल धंदरे, चंद्रशेखर बोरकुटे, जनहित संस्थेचे अध्यक्ष मुकुंदा हासे, स्वप्निल बुटले, प्राचार्य पेंढारकर, प्रा.संतोष बांदुरकर, ग्रामसेविका ममता बक्षी, ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर उपस्थित होते. 

गावाचा प्रचार करण्याची परवानगी द्या-'आम्ही भारताचे लोक' या संविधानिक मूल्यावर घाटकुळ गावाची वाटचाल आहे. संपूर्ण गाव पाहिल्यानंतर मला या गावात लोकनिती दिसली. गावकऱ्यांच्या परिश्रमातून हा गाव घडला आहे. आपल्या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यावा यासाठी मी इतर ठिकाणी प्रचार करणार आहे, मला आपल्या आदर्श गावाचा प्रचार करण्याची परवानगी द्या असे देवाजी तोफा यांनी गावक-यांना म्हटले. त्यांच्या या शब्दावर गावक-यांनी आनंद व्यक्त केला.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियातून आदर्श गाव म्हणून नावलौकीक घाटकुळ गावात विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवण्यात आले. युवा जनहित बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून यंदा दिवाळीला 'संकल्प स्वच्छतेचा, फटाकेमुक्त दिवाळीचा' असा संदेश देत 'दिव्यग्राम २०१९ महोत्सव' घेण्यात आला. कार्यक्रमात गावातील स्पर्धा परिक्षेतून यश संपादन करुन प्रेरणादायी ठरलेल्या स्वप्निल गायकवाड, चंद्रशेखर झाडे, सचिन बुटले, अॅड.किरण पाल, मोरेश्वर कोहपरे, अभिषेक देशमुख, अक्षय दोरीवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 


ग्रामविकासात उल्लेखनिय कार्याबाबत ग्रामपंचायत, मराठा युवक मंडळ, निर्मल महिला ग्रामसंघ यांना कर्तुत्व सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले.  यानिमित्ताने रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम रोहीणी प्रकाश वाकुडकर, द्वितीय भाग्यश्री आकाश देठे, तृतीय नीलीमा संदीप पाल, प्रोत्साहन पारीतोषिक निखिल रामदास चिताडे, पुष्पा साईनाथ पावडे यांनी पटकाविले.
            
सायंकाळी स्व. उद्धवराव बोबडे बहुउद्देशिय संस्था, टेंबुरवाही निर्मित समाज प्रबोधनाचा 'लोकजागर' कार्यक्रम पार पडला. यातून हागणदारीमुक्त गाव, स्त्रीभ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सशक्तीकरण यावर जनजागृती करण्यात आली. संचालन  रत्नाकर चौधरी, प्रस्ताविक अॅड.किरण पाल, आभार देविदास धंदरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा जनहित  बहुउद्देशिय संस्थेचे स्वप्निल बुटले, संदीप शिंदे, दिलीप कस्तूरे, रूपेश राऊत, दिलीप राऊत, निलेश सरपे, शुभम गुळी, रितिक शिंदे, बंडू राऊत, प्रफुल्ल मेदाडे राकेश गददे, तसेच मराठा युवा मंडळचे विठ्ठल धंदरे, संदीप सूंभटकर, योगेश देशमुख, चांगदेव राळेगावकर, अमोल जाड़े, सचिन शिंदे, समीर धंदरे, शुभम दयालवार व‌ ग्रामस्थांनी परिश्रम केले.