बोगस वार्ताहर सागर माहूरपावर ला अटक : टीव्ही 9चा वार्ताहर असल्याची बतावणी करून करायचा वसुली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बोगस वार्ताहर सागर माहूरपावर ला अटक : टीव्ही 9चा वार्ताहर असल्याची बतावणी करून करायचा वसुली

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :वरोरा-

काही दिवसांपूर्वी वरोरा येथील कृषी विभागात एक फोन आला. या फोनवरून टीव्ही नाईन वार्ताहर राहुल धोटे असे खोटे नाव सांगून पाच हजार रुपयाची मागणी केली होती. यानंतर कृषी कर्मचाऱ्यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल करून संबंधित वार्ताहरास  बोलण्यास सांगितले असता हा तोतया वार्ताहर पोलिसांचे नाव सांगताच फरार झाला.त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी वरोरा पोलिसांनी कंबर कसली. हा युवक वेगवेगळ्या नावाने तोतया वार्ताहर म्हणून फोन करायचा व पैशाची मागणी करायचा आणि पैसे दिले नाही तर संबंधित कोणताही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. पण पोलिसांना हा तोतया वार्ताहर हातात गवसत नव्हता. 

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी सापळा रचून या तोतया वार्ताहरास वणी येथून अटक करण्यात आली आहे. 


या तोतया वार्ताहराचे  खरे नाव सागर अरविंद माहूरपवार वय २५ वर्ष, राहणार आंबेडकर चौक पालिका मार्केट मागे वणी येथील असून वरोरा पोलिसांनी कलम ३८४, ५०७, १८६ भा द वि, अपघात क्रमांक १३७८/१८ नुसार गुन्हा नोंद करून वरोरा पोलीस चे ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मिश्रा, पीएसआय महेश बोंगुलवार करत आहे.सदर युवक वणी येथील रहिवासी असून वैभव लक्ष्मी ऑप्टिकल्स मधून त्याला अटक करण्यात आली आहे. 

हा युवक मेकॅनिकल इंजिनिअर असून वारंवार तोतया पत्रकार बनून व खोटे नाव सांगून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावत असे.