नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था,चंद्रपूर तर्फे दुर्धर आजाराने ग्रस्त 8 वर्षीय मन्नत ला आर्थिक मदत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था,चंद्रपूर तर्फे दुर्धर आजाराने ग्रस्त 8 वर्षीय मन्नत ला आर्थिक मदत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :श्री.दिलीप आगलावे,मुपो.चंद्रपूर यांचा मुलगा कु.मन्नत हा केवळ वयाच्या आठव्या वर्षीय दुर्धर आजाराने (Duchnne Muscular Dystrophy) ग्रस्त आहे.मन्नत चे वडील पेंटर असून परिस्थिती जेमतेम बेताची आहे,ह्या आजारावर खूप कठीण इलाज आहे आणि पैशाचीही तेवढीच मोठी गरज सुद्धा,त्यांनी मदतीसाठी आवाहन केले होते.

नाते आपुलकीचे ह्या सेवाभावी संस्थेने त्या आवाहनास प्रतिसाद देत आज दि.17 नोव्हेंबर रोजी 40 हजारांचा धनादेश सुपूर्द केला.ही मदत संस्थेच्या सर्व सदस्यांनी केवळ एक दिवसात जमा केली ही लक्षणीय बाब आहे. चंद्रपूर येथे सुरुवातीला व्हाट्सअपद्वारे एक तयार झालेला ग्रुप फार कमी कालावधीमध्ये आपल्या सेवाभावी वृत्तीने प्रकाशझोतात आला आहे,आज हा व्हाट्सअप ग्रुप एका संस्थेच्या नावाने उदयास येत आहे.संस्थेचे सदस्य दुबई, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर,चंद्रपूर,वणी अशा बऱ्याच शहर आणि खेड्यातून जुळले गेले आहेत,व्हाट्सअप वरून अशी मदतीची कामे करणारा व्हाट्सअप ग्रुप अख्या महाराष्ट्रात पहिलाच असावा,संस्थेचा प्रत्येक सदस्य मोठ्या तळमळीने काम करतो आहे.

धावपळीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळेचा अभाव असतो परंतु वेळात वेळ काढून ही मंडळी गरजवंतांना मदत करण्याचे महान कार्य करतो आहे,अशीच माणुसकीची कार्ये ही संस्था भविष्यात करणार आहे,रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोष ताजने,श्री.किशन नागरकर,श्री.किशोर तुराणकर, श्री.हितेश गोहोकार, श्री.धनराज आसुटकर,श्री.लेखराज देठे आणि श्री.उमेश पारखी यांनी मन्नतच्या आईवडीलास देऊन मन्नत लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली.