नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत जाहीर करून राज्यपालांनी केली शेतकऱ्यांची थट्टाच : यात लागवड खर्चही निघणार नसल्याच्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत जाहीर करून राज्यपालांनी केली शेतकऱ्यांची थट्टाच : यात लागवड खर्चही निघणार नसल्याच्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : 

अवकाळी संकटात सापडलेल्या शेतकरी राजाला अखेर दिलासा मिळाला असुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आली आहे. 2 हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी 8 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे. 

मात्र आजच जाहीर झालेल्या या मदतीने शेतकरी खिन्न झाला असून निव्वळ खरीप पिकांचेच नाही तर अधिकतर संपूर्ण वर्षभराच्या पिकांचेही नुकसान झाले असून ही मदत फारच तोडकी असून यात लागवड खर्च सुद्धा निघणार नाही तर वर्षभर च्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.