शिवसेना काँग्रेस आमदारांना ४० ते ५० कोटीची आँफर तर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना किती ?चंद्रपुरात चर्चेला उधाण ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शिवसेना काँग्रेस आमदारांना ४० ते ५० कोटीची आँफर तर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना किती ?चंद्रपुरात चर्चेला उधाण !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रथमच किशोर जोरगेवार या अपक्ष उमेदवारांना जनतेने 72हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देवून अवघ्या महारष्ट्रात  इतिहास रचला आहे. जे मताधिक्य दस्तुरखुद्द पालकमंत्री यांनी आजपर्यंत घेतले नाही त्यापेक्षा दीडपट मताधिक्य घेवून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनावर आणि मतावर किशोर जोरगेवार यांनी राज्य केलं आहे.
यामागे कारणही तेवढंच महत्वाच आहे, ज्या नाना शामकुळेंना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेमाखातर आणि त्यंच्या कामाखातर दहा वर्ष निवडून दिले त्यंच्या बद्दल जनतेत रोष होता आणि आता स्थानिक उमेदवारच हवा या एका तत्वाने किशोर जोरगेवार यांना भरभरून मतदान झाले.अर्थात हा सत्ताधारी भाजप विरोधातील जनतेचा कौल होता हे जाहीर आहे.त्यामुळेच किशोर जोरगेवार यांनी निवडून आल्यानंतर भाजपला समर्थन देवू नये अशी सगळ्या मतदारांची इच्छा होती.
कारण तर  किशोर जोरगेवार यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना आणि इतर सामजिक राजकीय संघटनांनी मोठे कष्ट ऊपसले होते.पण अगोदरच किशोर जोरगेवार यांचा कल हा भाजपकडे होता आणि केवळ नाना शामकुळें यांना हरवणे आणि त्यांना नागपूरला पाठवणे हा एक डाव ठरला होता.त्यामुळेच अपेक्षित असलेले किशोर जोरगेवार यांनी भाजप ला बिनशर्त समर्थन दिलं हे जाहीर झाले.

मात्र आता किशोर जोरगेवार यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपला बिनशर्त समर्थन दिल्यानंतर सुद्धा काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सदिच्छा भेट घेवून व आपण काँग्रेस सोबत सुद्धा असल्याचे दाखवून एक प्रकारे सत्ता स्थापनेच्या घोडा बाजारात आपली किमत किशोर जोरगेवार यांनी वाढवली असेल का ? हा प्रश्न आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनता करू लागली आहे. 

कारण जर सत्ताधारी भाजपला निवडूनच द्यायच होतं तर नाना शामकुळें यांनाच जनतेने निवडून दिलं असत, मग जर किशोर जोरगेवार हे भाजपलाच समर्थन देणार असतील तर नाना शामकुळें कुठे वाईट होते ? आता जर भाजपची सत्ता असती तर ते मंत्री सुद्धा झाले असते ? अशी चर्चा सुद्धा राजकीय पटलावर चर्चील्या जात आहे.

आता प्रसारमाध्यमांद्वारे भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या व काँग्रेसच्या एकएका आमदाराला 40 ते 50 कोटीची आँफर सद्ध्या देत असल्याची माहिती आहे तर किशोर जोरगेवार यांना सुद्धा तितकीच आँफर असेल का ? 

याबद्दल चंद्रपूर शहरात चर्चेला उधाण आले आहे. कारण किशोर जोरगेवार हे जरी मी विकास करण्यासाठी भाजपला समर्थन दिले असे म्हणत असले तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने भाजप विरोधात कौल दिला आहे, कारण भाजपची सत्ता येथील जनतेला भावलेली नाही त्यामुळेच किशोर जोरगेवार यांनी भाजपला बिनशर्त समर्थन देवून एकप्रकारे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेशी गद्दारी आणि धोखाधडी केल्याच्या प्रतिकृती सर्वसामान्य मतदाराकडून उमटत आहे.