विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून " संविधान दिन -70" ची प्रतिकृती : सातत्याने विविध कार्यकृतीतुन विद्यार्थी मनावर दिनविषेश-महत्व कोरण्याचा या शाळेचा आदर्श प्रयत्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विद्यार्थी साखळीच्या माध्यमातून " संविधान दिन -70" ची प्रतिकृती : सातत्याने विविध कार्यकृतीतुन विद्यार्थी मनावर दिनविषेश-महत्व कोरण्याचा या शाळेचा आदर्श प्रयत्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

"मानसशास्त्रानुसार कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष कृतीत उतरल्यावर जास्त काळ स्मरणात राहते" पुढे त्याचाच प्रत्यय प्रतिकृतीत येतो याचाच उपयोग करत अनेक शाळा विद्यार्थ्यांचा आदर्श विकास घडविण्याकरिता विविध कार्यशाळा, कलाकृतीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यशाळा घेत असतात. 

वर्षभर  येणाऱ्या दीन-सण विशेषांचे  विविधमहत्व विद्यार्थी मानवर कोरण्यासाठी  सातत्याने प्रत्यनशील असलेल्या शहरातील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल ,राजुरा वतीने विद्यार्थीनी-विद्यार्थी यांना साखळीच्या माध्यमातून " संविधान दिन -70 " लिहून आजचा दिवसाचे महत्व विशद केले. 
          


               

यामधे राष्ट्रीय हरित सेना,स्कॉऊट-गाईड चे विद्यार्थी सहभागी झाले.राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले व स्कॉऊट यूनिट लिडर रुपेश चिडे यांच्या मार्गदर्शनात ही विद्यार्थी साखळी तयार करण्यात आली. व भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.