चंद्रपूर प्रीमियम लीग (सीपीएल) सिजन-7 च्या लोगोचे अनावरण : टी -20 क्रिकेट लीग च्या आगामी सिजन चे जानेवारी 2020 चे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर प्रीमियम लीग (सीपीएल) सिजन-7 च्या लोगोचे अनावरण : टी -20 क्रिकेट लीग च्या आगामी सिजन चे जानेवारी 2020 चे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या चंद्रपूर प्रीमियर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आगामी सातव्या पर्वाच्या नवीन लोगोचे अनावरण वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.लाईफ फाऊंडेशनच्या वतीने सीपीएल या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. आयोजन समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना खेळण्याची आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आगामी सिजन -7 जानेवारी महिन्यात आयोजित होणार असून, त्याचा लोगो आज आभासचंद्र सिंग यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी सीपीएल आयोजन समितीचे सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, डॉ. किशोर भट्टाचार्य, वसीम शेख, कमल जोरा, नाहीद सिद्दीकी, शैलेंद्र भोयर, शहजाद सय्यद यांची उपस्थिती होती.

आयोजन समितीने जिल्ह्यातील सर्व भागातून चांगले खेळाडू या स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी तालुका प्रतिनिधी नेमले असून, त्यांच्या माध्यमातून या खेळाडूंचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी नोंदणी फॉर्मचे वितरण करण्यात आले. खेळाडूंनी या प्रतिनिधींशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.