चंद्रपूर सैनिकी शाळेत मुलींसाठी प्रवेश सुरु : 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर सैनिकी शाळेत मुलींसाठी प्रवेश सुरु : 6 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - राजुरा 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळा चंद्रपूर येथे मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्यात येणार असून त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य स्क्वार्डन लीडर नरेशकुमार यांनी केले आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश सुरू केला आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूरसैनिकी शाळेपासून हि सुरुवात होत आहे.

शैक्षणिक वर्ष 2020 करिता मुलींना सैनिकी शाळेचे शिक्षण मिळवण्याची दारे खुली झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात नव्यानेच उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. 26 नोव्हेंबर 2019 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून मुलींना वर्ग 6 वी करिता प्रवेश घेण्याकरिता साठी 6 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करावी, असे सैनिकी शाळेमार्फत आव्हान करण्यात आले आहे.