मोकाट कुत्रे आडवे येऊन 5 दात पडून गंभीर अपघात - चंद्रपूर मनपा कधी करणार मोकाट जनावरांचा बंदोबस्त? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मोकाट कुत्रे आडवे येऊन 5 दात पडून गंभीर अपघात - चंद्रपूर मनपा कधी करणार मोकाट जनावरांचा बंदोबस्त?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शहर प्रतिनिधी -


शहरात नुकत्याच महापौर बदल झाल्यानंतर शहरातील विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा होती मात्र भाजप सत्ताधारी यांनी जणू जनतेला वाऱ्यावर सोडून अच्छे दिनच्या नावावर त्यांच्या हक्क अधिकारावर गदा आणली असल्याचे विदारक चित्र सध्या शहरात बघावयास मिळत आहे.शहरातील जनता जावून जावून जाणार कुठे ? शेवटी ती आम्हच्याकडेच येईल या राजकीय आत्मविश्वासाने सत्ताधाऱ्यांनी शहरवाशीयांना ग्रुहीत धरले आहे.एकिकडे पिण्याचा पाण्याचा प्रश्न दुसरीकडे रस्त्यांची दुर्दशा आणि स्वच्छतेचा नावाखाली प्रत्त्येक शहरातील घरांच्या करात वाढवलेली 450 रुपयाची रक्कम! 


शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुद्धा मनपा करू शकत नसल्याने त्यांच्या अडथळ्यामुळे सुद्धा अपघात होत आहेत, नुकताच महाराष्ट्र मेट्रो न्यूज पोर्टलचे संपादक रोहित तुराणकर हे आपल्या घराकडे जात असतांना नेहरू नगर चौका जवळ मोकाट कुत्रा त्यांच्या दोन चाकी सामोरं आल्याने अपघात झाला आणि त्यांना जबर जखमा होऊन समोरचे दात सुद्धा पडले. 


असे कितीतरी प्रसंग शहरातील नागरिकांवर येत असून आतातरी मनपा प्रशासनाला जाग येईल का ? असा प्रश्न आता शहरातील जनता विचारू लागली आहे.