वाघाच्या हमल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गाव आक्रोशत : तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी : मृतक कुटुंबियांना तात्काळ 1लाखाची मदत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाच्या हमल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गाव आक्रोशत : तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी : मृतक कुटुंबियांना तात्काळ 1लाखाची मदत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - 26/11/2019- 6:30AM

काल दि. 25/11/2019 ला मूर्ती गावात वाघाच्या हल्यात  शेतकरी श्रीहरि साळवे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मूर्ति गावात तणावपुर्ण वातावरण निर्माण होऊन रात्री उशिरा पर्यंतगावातील संपूर्ण नागरिकांनी कुटुंबियांसोबत एकत्रित येऊन   मोबदला मिळाल्याशिवाय म्रूतदेह ताब्यात घेणार नाही व वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा असा आक्रोश व्यक्त करण्यात आला.सदर परिस्थिती लक्षात घेता आमदार सुभाष धोटे हे बाहेर असल्यामुळे राजुराचे  नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी कुटुंबीयांची तात्काळ भेट देऊन  स्थानिक जनतेशी संवाद साधला.  गावातील तणाव कमी करताना नगराध्यक्ष अरुण धोटे या वेळी जनतेची समजणूक काडून त्यांची मागणी प्रशासनाला समजावून सांगितले व 15 लाख चीआर्थिक मदत मिडवून देण्याचे लेखी आश्वासन लिहून देण्यात आले आणि प्रयत्न करून तात्काळ 1 लाख चे धनादेश मिडवून दिले.

त्यांनतर मृतक साळवे यांचा मृतदेह हलवण्यात आला.  या वेळी उपस्थित पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर. तहसीलदार रवींद्र होळी साहेब. पोलिस उपविभागीय अधिकारी स्वपनिल जाधव साहेब. वन विभागाचे अधिकारी गरकल साहेब सहित गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------
वाघाने केली गुरांना चारा टाकण्यास गेलेल्या शेतकऱ्याची शिकार : आज सायंकाळी 5वाजताच्या सुमारासची घटना 
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -25/11/2019- 7:10PM


राजुरा तहसीलमुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मूर्ती गावाच्या शेतशिवारात शेतात गुरांना टाकण्यास गेलेल्या शेतकरी श्रीहरी साळवे (वय -46) यांचेवर वाघाने हमला चढवत ठार केले. 
                   
राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील शेतं शिवारात वाघाणे धुमाकूळ घातला असून आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास  मूर्ती येथील श्रीहरी विठोबा साळवे या शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याणे संपूर्ण परिसरात भीती चे वातावरण पसरले आहे.


मृतक साळवे व त्याची पत्नी दोघेही नेहमीप्रमाणे बैलांना घेऊन आपल्या शेतात गेले होते.सध्या शेतात कापूस व मिरची चे पीक असल्याने पीकाची पाहणी व नियमित शेतातिल काम पार पाडत असतांना अचानकपणे वाघाने हल्ला चळवला. यावेळी बैल सैरावैरा पडायला लागले परंतु श्रीहरी साळवे यांना मात्र काहीही सुचले नाही.क्षणाचाहि विलंब न लावता वाघाने जागीच शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतला.आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने तेथून वाघ पसार झाला.घटनेची माहिती मिळताच वीरुर पोलीस स्टेशन चे पोलीस घतनास्थली पोहचले व म्रूतदेह ताब्यात घेतला.श्रीहरी साळवे यांच्या म्रूतू पश्च्यात पत्नी , दोन मुली व एक मुलगा आहे.


मूर्ती येथील शेतकरी श्रीहरी साळवे हे बैल शेतात चारीत असताना दबा धरून बसलेला वाघाने बैलावर हल्ला करण्याचे बेतात श्रीहरी यांच्यावरच हल्ला करुंन जागीच ठार केले आणि त्याला काही अंतर दुरपर्यत ओढत नेल्याची घटना आज सायंकाळी घडली

       
मध्य चांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या राजुरा वनपरिक्षेत्र तील विहिरगाव उपक्षेत्रातील घटना असून माहिती मिळताच वन कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येत पोहचले आहेत रात्रीची वेळ असल्याने शेतशिवारात घटनास्थळी जाणे धोक्याचे असून वाघ शेतात लपून बसला असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.       
राजुरा वनक्षेत्रात वाघाचा वावर असल्याने शेतकर्याना सावध राहणे बाबत जनजागृती केली जात होती परंतु चक्क शेतातच वाघ लपून शेतकऱ्यावर हल्ला केल्याने जनतेत दहशत पसरली आहे.

   
सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल, वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट व तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी घटनास्थळ गाठले असून पुढील तपास सुरु आहे.


या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गावकर्यांनि केली आहे. बातमी लीहेस्तोवर म्रुतदेह घटणास्थळ होता.