गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंती निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन, शोभायात्रेचेही स्वागत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंती निमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन, शोभायात्रेचेही स्वागत

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
आज शनिवारी गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंती निमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिख बांधवांकडून काढण्यात आलेल्या  शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माल्यार्पण व फळ वाटप करुन स्वागत करण्यात आले. दरम्यान शिख बांधवांकडून शहराच्या मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. हसन इलेस्ट्रीकल समोर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या धर्म गुरुं ना माल्यापर्ण करुन शोभायात्रेचे फळवाटप करण्यात आले. 

गुरुनानक यांच्या जयंती निमित्य दर वर्षी यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. यावर्षी सुद्धा  त्यांच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करून फळ वाटप करण्यात आले. या शोभायात्रेत यंग चांदा ब्रिगेड कडून अजय जयस्वाल, बलाराम डोडानी, मुन्ना जोगी, विश्वजीत शहा, नरेश मोटवाणी, राहूल पाल, विपीन निंबाळकर, विनोद अनंतवार, करणसिंह बैस, अमोल शेंडे, रुपेश पांडे वंदना हातगावकर, सायली येरणे, कविता शुक्ला, पूजा शेरकी, प्रेमीला बावणे आदिंची उपस्थिती होती.यंग चांदा ब्रिगेड च्या स्थापने पासूनच सामाजिक उपक्रमासह धार्मिक क्षेत्रातही काम केल्या जात आहे.