अवैध मोहफुल भट्टीवर चिमूर पोलिसांची धाड :51 लाखांचा मोहसडवा जप्त - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध मोहफुल भट्टीवर चिमूर पोलिसांची धाड :51 लाखांचा मोहसडवा जप्त

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : चिमूर  - प्रतिनिधी ( जावेद पठाण )काल दिनांक 29 /11/2019 रोजी पोलीस स्टेशन चिमूरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की कवडशी परिसरातील माणूसमारी जंगल परिसर तसेच रावणापाट जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या हातभट्टीवर मोहा दारू गाळण्या करिता शेकडो प्लास्टिक ड्रममध्ये मोहा सडवा भरून जमिनीत पुरवुन ठेवलेले आहे.अशा माहितीच्या आधारे पोलिसांच्या ताफ्यासह शोध मोहीम राबवली असता एकूण 51,25800 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

याबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध एकूण 10 गुन्हे नोंदविण्यात आले असून सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक धुळे, पोलिस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस हवालदार विलास निमगडे, दिवाकर ढोक, जमनादास सोनटक्के, पोलीस शिपाई विनायक सरकुंडे, रोशन तामसेटवार, मंगेश सरपाते, शंकर बोरसरे, सुशील आठवले, सचिन खामनकर, प्रमोद गुट्टे, देविदास रणदिवे, अवधूत खोब्रागडे, शैलेश मडावी, दिलीप वाळवे, मनोज ठाकरे, प्रवीण गोनाडे, रामेश्वर डोईफोडे, महिला पोलीस उज्वला परचाके, उज्वला निकुरे, मंगला मेश्राम, चालक विजय उपरे, कैलास वनकर तसेच  6 गृह रक्षक दलाचे कर्मचारी यांनी केलेली आहे.