चांदा ते बांदा योजनेअंतर्गत 504 लाभार्थ्यांना शुध्द देशी दुधाळ गाय मंजूर :पैकी 260 गायींचेपोंभुर्णा, मुल व बल्लारपूर तालुक्यातील लाभार्थ्यांना वाटप - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत 504 लाभार्थ्यांना शुध्द देशी दुधाळ गाय मंजूर :पैकी 260 गायींचेपोंभुर्णा, मुल व बल्लारपूर तालुक्यातील लाभार्थ्यांना वाटप

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाची जोड दिल्यास वर्षंभर सातत्यपूर्ण उत्पन्न मिळावे यासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत पोंभुर्णा, मुल व बल्लारपूर या तीन तालुक्यातील  ५०४ लाभार्थ्यांची शुध्द देशी दुधाळ गाय वाटप योजनेसाठी  निवड करण्यात आली असून १३० लाभार्थी शेतकऱ्यांना २६० शुध्द देशी दुधाळ गाय वाटप करण्यात आल्या आहे. उर्वरित ३७४ लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच गाई वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना जोडधंडा मिळाला असून त्यांना वर्षंभर सातत्यपूर्ण उत्पन्न मिळणार आहे.


यापैकी १३० शेतकऱ्यांना २६० गाईचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये  पोंभुर्णा येथील २७ शेतकरी, बल्लारपूर येथील ६५ शेतकरी, मुल येथील ३८ शेतकऱ्यांना गाई वाटप करण्यात आलेल्या आहे. उर्वरित ३७४ लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच गाई वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांमध्ये पुरुष – ४५२ व स्त्री -५२ असे एकुण ५०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजननेसाठी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत ५ कोटी ५९ लक्ष २० हजार रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार प्रती  लाभार्थी २ प्रमाणे देशी  गायी  खरेदी समितीद्वारे पडताळणी करुन खरेदी करण्यात आल्या आहे. खरेदी करण्यात आलेल्या गाईचा ३ वर्षांचा विमा काढण्यात येणार आहेत. 

सदर योजना अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गांसाठी  ९० टक्के अनुदान व सर्वसाधारण प्रवर्गासाठी  ७५ टक्के अनुदानावर आहे. या योजनेमुळे ५०४ लाभार्थीच्या कुटुबांना दुग्ध्व्यवसायाचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. प्रती लाभार्थी अंदाजीत १ हजार रूपये प्रती महिना उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. 


यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. वाटप करण्यात आलेली गाईच्या पाहणीकरीता चांदा ते बांदा  योजनेच समन्वयक धिरज डाहुले व युवा व्यावसायिक अमोल घुगुल यांनी पाहणी केली. दुधाळ जनावरांना खाद्य व पोषक आहार तसेच गाई व वासरांला वेळेवर जंतनिमुर्लन औषधी  देण्याबाबत मार्गदर्शन केले.