महावितरण कार्यालयाच्या आवारात 5 फुटाचा अजगर - सर्पमित्रांने दिले जीवनदान - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महावितरण कार्यालयाच्या आवारात 5 फुटाचा अजगर - सर्पमित्रांने दिले जीवनदान

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -

काल सायंकाळी वरोरा येथील महावितरण कार्यालयालगत झाडांच्या मधे साप असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा साप मोठ्या लांबीचा अजगर असून कार्यालयीन आवरत सरपटत होता हे निदर्शनास आल्यावर कर्मचारी भयभीत होऊन सर्वत्र माहिती पसरताच शहरातील नागरिकांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली.याची माहिती शहरातील सर्प मित्र विशाल ढोक  मिळताच आपल्या इतर सहयोगी सर्पमित्र हिमालय मडावी यांनी घटनास्थळी पाहोचून झाडात लपून बसलेल्या पाच फुट लांब  अजगर सापाला पकडण्याची मोहिम सुरु केली व सापाला पकडून जिवनदान दिले आहे.

अजगर साप असल्याची  माहिती  मिळताच विशाल ढोक व त्याचे सहयोगी मित्र हिमालय मडावी घटना स्थळ कडे प्रस्थान केले.सापाला सेफ्टी रेक्कु करुन वन विभाग ला नोंदनी करुन दिली आहे  सर्वजण सापाच्या भीतीमुळे बाहेर पळाले होते. यावेळी सर्पमित्र विशाल ढोक व सहयोगी मित्र हिमालय मडावी यांनी सापाला पकडण्याची मोहिम सुरू केली.

अखेर सापाला बाहेर काढले  यामुळे त्या सापाला जिवनदान मिळाले आहे. व अजगर सापाला पाहण्यासाठी लोकांनी चांगली गर्दी  केली होती.या कार्य साठी र्सप मित्र विशाल ढोक व त्याचे सहयोगी मित्र हिमालय मडावी यांचेआभार व्यक्त केले आहे.