ब्रेकिंग न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रशासकीय भूकंप : 4 सरपंचासहित तब्बल 71ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द ! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात प्रशासकीय भूकंप : 4 सरपंचासहित तब्बल 71ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द !

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : - (संस्थापक/मुख्य संपादक -कु.गोमती पाचभाई )


मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या 1958च्या कलम 10-1अ अन्व् ये आणि ग्रामविकास व जलसंधारण विभाग, यांचे शासन निर्णय क्र. ग्रा.पं. नि.-2014/प्र. क्र.-2दिनांक 4ऑगस्ट 2016अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून  चंद्रपूर जिल्हाधीकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी तब्बल 4सरपंचासहित 71ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने  रद्द करण्याचा आदेश दिनांक 4नोव्हेंबर 2019ला पारित करून चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात जबर प्रशासकीय दणका दिला आहे.

या 71 सदस्यांच्या यादीत प्रामुख्याने नागभीड तालुक्यातील सरपंच व सदस्यांचा समावेश असून इतरही तालुक्यातील जात प्रमाणपत्र विहित वेळेत सादर न केलेल्या सर्व सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. तर  जिल्ह्यातील अनेकांनी याचा धसका घेतला असून विधानसभा निवडणुकीनंतर लगेच या स्थानिक स्वराज संस्थेच्या मुख्य घटकाला दिलेल्या  दणक्याने राजकीय तणावग्रस्त वातवरण निर्माण झाले आहे.

पदे रद्द झालेल्या सरपंचामध्ये नागभीड तालुक्यातील गिरगांव -प्रशांत गायकवाड, कोसंबी -रंजूताई गायकवाड, नवेगाव -शर्मिला रामटेके , गोविंदपूर -उमाजी खोब्रागडे यांचा समावेश असून बाकी सदस्यांची यादी तहसीलदार, बीडीओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांना कळविण्यात आली असून सर्व ग्रामपंचायतींना आदेश पोहोचताच ग्रामपंचायत सूचना फलकावर तात्काळ लावन्याचे सुद्धा सूचित करण्यात आले आहे.आदेशात नमूद केल्याप्रमाणे 3-12-2018रोजी जिल्हा कार्यालयात या संबंधात सुनवाई करण्यात आली होती.रद्द झालेले सर्व ग्राम पंचायत सदस्य हे 2015ते 2018 या या कार्यकाळात झालेल्या निवडणुकीत आरक्षणाखाली निवडून आलेले सदस्य असून बहुतांश सदस्य अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. त्यातही माना समाजाच्या सदस्यांची संख्या अधिक आहे.
याबाबत टीम खबरकट्टा ने अधिक माहिती घेतली असता जात पडताळणी कार्यालयातच माना समाजचे अनेक अर्ज प्रलंबित असून त्या संबंधाचे प्रमाणपत्र सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनवाई दरम्यान सादर केले असूनही अचानक हा सदस्यत्व रद्द बाबत आदेश आल्याने नागभीड तालुक्यातील सदस्यांमधे  खळबळ उडाली आहे. 

किमान ज्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक अर्ज सादर करते वेळी व त्यानंतर विहित मुदतीच्या आत सादर केले आहेत अश्या सदस्य चे बरखास्ती चे आदेश त्वरित रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे व शिष्टमंडळ यांनी आज पं.स.नागभीड च्या सं.वि.अ. सौ.गायकवाड यांचेकडे केली असून उद्या दिनांक 8 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचे टीम खबरकट्टा सोबत बोलताना कळविले आहे.
मात्र एकाच आदेशात इतक्या मोठया प्रमाणात सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या बरखास्ती, हे बहुदा संपूर्ण महाष्ट्रात पहिल्यांदाच घडले असावेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यासहित इतर ही तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या सदस्यत्व रद्दबाबतचे आदेश निघाले असल्याची माहिती नाव न लिहिण्याच्या अटीवर एका जबाबदार अधिकाऱ्यांनी दिली टीम खबरकट्टा ला दिली असून नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या जिल्ह्यातील फेरबदल निकालानंतर ग्रामीण क्षेत्र आधारित हा भूकंप काय स्वरूप घेईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश संपूर्ण यादी व  करा डाउनलोड :