जिल्ह्यात 7 ते 12 नोव्हेंबर पर्यंत कलम 36 लागू करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यात 7 ते 12 नोव्हेंबर पर्यंत कलम 36 लागू करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :जाहीर सूचना 

वि.प्र.चंद्रपूर, अमर बुद्धारपवार : दिनांक 10 नोव्हेबर रोजी ईद-ए- मिलाद व दिनांक 12 नोव्हेबर 2019 रोजी गुरुनानक जंयती असल्याने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दिनांक 7 नोव्हेबर 2019 च्यामध्ये रात्रीपासून ते 12नोव्हेबर 2019 पर्यतच्या मध्यरात्री पर्यत जिल्ह्यात कलम 36 चे पोटकलम (अ) ते (फ) लागू असणार आहे.या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवसथेला बाधा पोहचू नये म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डडी यांनी उपरोक्त  कालावधीत कलम ३६ ची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविण्यणेबाबत सभेचे आयोजन मिरवणूक काढण्याबाबत, त्या ठिकाणी रस्ते निश्चित करणे बाबत, लाऊड स्पिकर वापरण्याबाबत, योग्य निर्बध निर्दश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्या पेक्षा कनिष्ट दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.