चलो चंद्रपूर ! चलो चंद्रपूर ! : दुसरी शेतकरी हक्क परिषद -26 नोव्हेंबर - "विसरू आम्ही राजकीय मतभेद : हक्कासाठी होऊ एक" - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चलो चंद्रपूर ! चलो चंद्रपूर ! : दुसरी शेतकरी हक्क परिषद -26 नोव्हेंबर - "विसरू आम्ही राजकीय मतभेद : हक्कासाठी होऊ एक"

Share This
चंद्रपुरात दुसऱ्या शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन : 26 नोव्हेंबर ला क्लब ग्राउंड, न्यू इंग्लिश क्रीडांगणावर शेतकऱ्यांना एकत्रित होण्याचे आवाहन  

खबरकट्टा / चंद्रपूर – 

शेतकरी हक्क परिषद जिल्हा चंद्रपूर तर्फे भव्य शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, 26 नोव्हेंबर ला  सकाळी 10 वाजेपासून क्लब ग्राउंड, न्यू इंग्लिश क्रीडांगणावर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
आयोजित कार्यक्रमात आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, अजित नवले, रंगारी राचुरे, चंद्रकांत वानखेडे, अमर हबीब व माजी आमदार वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती असणार अशीमाहिती आज चंद्रपूर येथे  पत्रकार परिषदेत आयोजक सुनील मुसळे, बळीराज धोटे यांनी दिली.शेतकऱ्यांच्या हक्क परिषदेत वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या, त्या समस्येवर शासनाने करावयाचे नियोजन, मानवाचा सर्प दंशाने, वीज पडून, पुरात वाहून गेल्याने मृत्यू पावल्यास 15 लाखांची आर्थिक मदत करावी, स्वामिनाथन आयोग लागू करावे, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यात यावा अश्या अनेक विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार असून या समस्या तात्काळ मार्गी कश्या लावता येणार यावर सुद्धा निर्णय घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन आपल्या समस्या व त्याचे योग्य पर्याय समाधान शोधण्याकरिता एकत्रित व्हावे असे आवाहन विजय बदखल, बळीराज धोटे, सुनील मुसळे, रुद्र कुचनकर, प्रदीप बोबडे, सुनील भोयर यांनी केले आहे.