27 महागरपालिकांच्या महापौरांच्या आरक्षणाला उद्याचा मुहूर्त : दुपारी 3:30वाजता नगर विकास विभागात सोडत - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

27 महागरपालिकांच्या महापौरांच्या आरक्षणाला उद्याचा मुहूर्त : दुपारी 3:30वाजता नगर विकास विभागात सोडत

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

राज्यातील 27 महापालिकांतील महापौर पदाचे आरक्षण बुधवारी (ता.13) काढण्यात येणार आहे. नगर विकास  विभागाचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी तीन वाजता सोडत काढण्यात येणार आहे. 

सोडतीवेळी महापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र नगर विकास विभागाचे अपर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काल दिनांक 11 नोव्हेंबर सोमवारी पाठवले आहे. 


चंद्रपूर महानगर पालिकेच्या 2017 निवडणुकीनंतर पहिल्या महापौर  अडीच वर्षाच्या कार्यकाळाकरिता इतर मागास वर्गीय महिला हे आरक्षण आल्याने निवडणुकीत बहुमत प्राप्त भाजपच्या सौ.अंजली घोटेकर यांची महापौर पदी वर्णी लागली आता त्यांच्या नंतर कोणते आरक्षण जाहीर होणार हे उद्या ठरणार असून याकडे सर्व इच्छुक नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.