235लक्ष रुपयांच्या आरोग्य केंद्रचे बांधकाम मुदत संपूनही अधुरेच व नित्कृष्ट दर्जाचे : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

235लक्ष रुपयांच्या आरोग्य केंद्रचे बांधकाम मुदत संपूनही अधुरेच व नित्कृष्ट दर्जाचे :

Share This
-दवाखाना बांधकाम जोमात मात्र करोडो रुपयाची आदेश फलक मात्र कोमात : कामाची मुदत संपूनही बांधकाम अधुरे.

खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर प्रतिनिधी -

राज्याचे वित्त नियोजन ' वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्थानिक निर्वाचित क्षेत्रातील येत असलेल्या कोठारी मार्गावरील कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र (दवाखान्याचे) बांधकाम जिल्हा परिषद अंतर्गत चालू असून या कामास मुदत संपूनही बांधकाम अधुरे असल्याने व दर्शनी भागात बांधकामाच्या कामाची किंमतीचा निधी फलक बोर्ड व कालावधीचा फलक न लावता काम कासवगतीने काम सुरू असून जनतेला योग्यवेळी योग्य उपचार होण्याकरिता तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नातून कळमना येथे 235 लक्ष रुपयांचे आरोग्य केंद्र बांधकाम मंजूर केले होते.


या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट गोंदिया येथील कंपनीत दिलेले असतांना या कंपनीने विशिष्ट कालावधीत काम न केल्याने कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याचे निदर्शनात येत असल्याचे मत गावकर-यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले आहे तर कळमना या गावामध्ये असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातील जनतेला वरदान ठरणार आहे. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व कॉन्ट्रॅक्टरच्या चालढकल कामामुळे कामामध्ये मोठ्या प्रमाणात, मुदत संपून सुद्धा  बांधकाम पूर्ण झालेले नाही. काम किती किमतीचे आहे? किती कालावधी मध्ये पूर्ण करणे ? याची मुदत आहे? काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदार चे नाव व पत्ता याची माहिती चा फलक लागणे फार महत्त्वाचे असतांना जनतेच्या मनामध्ये विविध प्रश्न निर्मान होत आहेत. 

परंतु नियमाला बगल देऊन बांधकाम चालू केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना व आदिवासी समाज यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रशासन स्वत:चे कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर योजना मंजूर करीत असतात परंतु या करोडो रुपयाच्या कामामध्ये नियम व अटी पूर्ण न केल्यामुळे अनेक गैरप्रकार पुढे येऊ शकते. दर्शनी भागावर आधीच फलक लावण्याची मागणी गावकरी करीत आहे. गोंदिया येथील कंपनीने हे काम स्थानिक नेत्याकडे दिल्याची माहिती समोर आली आहे. निधी उपलब्ध नसल्याचे उद्घाटनाच्या दिवशी फलक लावण्यात येईल असे इंजिनिअर कडून सांगण्यात आले आहे.