गुडशेला येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा 225 वा जयंती सोहळा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गुडशेला येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांचा 225 वा जयंती सोहळा संपन्न

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : जिवती - संतोष इंद्राळे भारत देशाला इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त करून स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी सशस्त्र क्रांतीची मुहुर्त मेढ रोवली व " जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी " अशी प्रतिज्ञा घेऊन इंग्रजाविरुद्ध लढा उभारला आणि लढण्यासाठी अनेक क्रांतिकारक तयार केले आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांना सर्वतोपरी सहकार्य करून बहुजनांच्या शिक्षणाचा मार्ग सुखद करणारे असे महामानव आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 225 वी जयंती सोहळा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि.23/11/19 ला गुडशेला ता.जिवती येथे आयोजित करण्यात आली होती.


सकाळी ठीक 8.30 ला मा.सोपान मोरे,पो.पा. श्रीमती कमलबाई कुमरे,सरपंच मा.जालीम कोडपे,त.मु.अध्यक्ष मा.हनुमंत देवकते,उपसरपंच मा.डाहुले,सचिव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,व त्यानंतर ठीक सकाळी 10.00 वा.क्रांतीकारी नवयुवक मंडळ गुडशेला यांच्या नेतृत्वात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली,ठीक 2.00 वा.मुक्ता फाउंडेशन व लहुजी बिग्रेड यांच्या नेतृत्वात जिवती ते गुडशेला मोटारसायकल रॅली काढण्यात आली.


या कार्यक्रमाचे उद्गाटक म्हणून श्री.जी.एस.कांबळे,सामाजिक कार्यकर्ता गडचांदूर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवरावजी कांबळे ADCC बँक माजी अध्यक्ष आदीलाबाद हे होते,दुपारी 4.00 वा.मार्गदर्शनाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली,प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंकुश सि सिदगीकर, डॉ.प्रशांत सुर्यवंशी नरशिंग मोरे, दत्तराज गायकवाड, सुग्रीव गोतावळे , नभिलास भगत, भानुदास जाधव, बर्डे, शरद वाठोरे मा.संतोष जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, बाळूभाऊ धानोरकर, सुभाष धोटे, कमलाबाई राठोड, अरुण धोटे, महेश देवकते, अनिता गोतावळे, पंकज पवार, सुजाता भगत, शेख अशपाक, कैलास राठोड, मारोती बेल्लाळे आदी सर्व प्रमुख पाहुण्यांनी व मार्गदर्शकांनी जमलेल्या सर्व नागरिकांना क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या विषयी मार्गदर्शन केले,व रात्री ठीक 9.00 वा.मा.शाहीर संभाजी ढगे,विदर्भाचा बुलंद आवाज चंद्रपूर  व गायिका अंजली घोडके,महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका लातूर यांचा कव्वालीचा जंगी मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गुडशेला वाशीय यांनी केले होते.