महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 ची " टीईटी " परीक्षा 19 जानेवारीला 2020 ला : 28 नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 ची " टीईटी " परीक्षा 19 जानेवारीला 2020 ला : 28 नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :नौकरीकट्टा -


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी ) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर दिली आहे,त्यानुसार यंदाची " टीईटी " परीक्षा ही 19 जानेवारी 2020 ला होणार आहे. 

पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या,सर्वमाध्यमांच्या,अनुदानित,विनाअनुदानित,कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवकांची भरती केली जाते त्यासाठी उमेदवारांना " टीईटी " परीक्षा बंधनकारक केली आहे.


या परीक्षेसाठी पात्र उमेदवाराकडून 08/11/2019 पासून आपला अर्ज ऑनलाईन भरायचा आहे 28 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यांना 4 ते 19 जानेवारी या कालावधीत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेता येणार आहे,या परीक्षेचा पहिला पेपर 19 जानेवारीला सकाळी 10.30 ते 1.00 तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत होणार आहे.
         
प्रवेशसंबंधी सर्व माहिती परीक्षा परिषदेेच्या  https ://mahatet.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.तरी विध्यार्थ्यांनी ती माहिती पाहून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी केले आहे.