उन्नत भारत अभियान अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात व्यवसाय नियोजन स्पर्धा 2019(नोंदणीकरिता 15डिसेंबर पर्यंत मुदत वाढ ) - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उन्नत भारत अभियान अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात व्यवसाय नियोजन स्पर्धा 2019(नोंदणीकरिता 15डिसेंबर पर्यंत मुदत वाढ )

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासालाचालना देण्यासाठी तसेच बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता उन्नत भारत अभियान अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यात व्यवसाय नियोजन स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून 15 डिसेंबर 2019 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. या स्पर्धेच्या नोंदणीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी यासाठी नोंदणी केली आहे. हि स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी असून त्यात विद्यार्थी, उद्योजक, महिला, व्यावसायिक खासगी तसेच शासकीय कार्यालय व कार्यालयातील अधिकारी यांनाही सहभागी होता येणार आहे.
>

शेती विकास, ग्रामीण विकास, सामाजिक विकास, पर्यावरण, औद्योगिक विकास या 5 विषयावर संकल्पना स्पर्धकांना सादर करायचे आहे. संकल्पनांचे सादरीकरण झाल्यानंतर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात येईल. स्पर्धेतील प्रत्येक विषयाच्या प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात येणार असुन प्रथम विजेत्याला 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला 30 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला 20 हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच इतर उत्कृष्ट संकल्पनांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. संकल्पना ज्या विभागाशी संबंधित असतील त्या विभागामार्फत 5 लाख रुपयापर्यंत कार्यादेश देण्यात येईल.

त्यामुळे नवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास मदत होईल.
 नवसंकल्पनेतील उपाययोजना चंद्रपूर जिल्ह्याच्या सामाजिक प्रादेशिक आणि पर्यावरण या परिस्थितीला अनुसरून असावी. या स्पर्धेकरिता तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. युवा गटात 18 वर्षे वयोगटातील स्पर्धक, वरिष्ठ गटात 18 ते 25 वर्ष वयोगटातील तर खुल्या गटात 25 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्पर्धकांचा समावेश आहे. 


प्रत्यक्षात उद्योगात रूपांतरित होऊ शकणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यक्ती किंवा संस्थांनी या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे. या स्पर्धेची ऑनलाइन नोंदणी 15 डिसेंबर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या तज्ञ समितीमार्फत या संकल्पनांची तपासणी करण्यात येणार आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात 8 नोव्हेंबर 2019 रोजी  जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, जिल्हा कौशल्य विभागाचे उपसंचालक भैय्याजी येरमे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नरेश उगेमुगे उन्नत भारत अभियानाच्या विभागीय प्रमुख अर्चना बारब्दे विविध विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी हॅलोचांदा 155 398 या क्रमांकावर संपर्क करावा. तरी या स्पर्धेचा जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.