"नुकसान एकाचे : पंचनामे व भरपाई दुसऱ्याला" -खरे नुकसानग्रस्त वंचित शेतकरी आशिष ताजने यांच्या नेतृत्वात धडकले तहसील कार्यालयावर : 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मिळालेल्या नुकसानभरपाईत अनेक खरे नुकसानग्रस्त वंचित - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"नुकसान एकाचे : पंचनामे व भरपाई दुसऱ्याला" -खरे नुकसानग्रस्त वंचित शेतकरी आशिष ताजने यांच्या नेतृत्वात धडकले तहसील कार्यालयावर : 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मिळालेल्या नुकसानभरपाईत अनेक खरे नुकसानग्रस्त वंचित

Share This

-खरे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन.खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना तालुक्यातील नारंडा येथील शेतकऱ्यांची सन 2018 जुलै-आगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांची नुकसान झाली होती परंतु  अनेक शेतकऱ्यांना सदर नुकसानभरपाई मिळालेली नाही ती नुकसानभरपाई मिळण्यात यावी याकरीता नारंडा येथील शेतकऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वात कोरपना येथील तहसील कार्यालय येथे धडक देऊन तहसिलदार यांना निवेदन दिले.
        


सन 2018 मध्ये जुलै व आगस्ट महिण्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली होती,त्यामध्ये कोरपना तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतपिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती,त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिक पंचनामे करण्यात आले.     
       
परंतु जेव्हा मंजूर यादी प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली होती,तेव्हा नाल्याजवळ अतिशय जास्त शेतपिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे त्यामध्ये नव्हते त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे नारंडा येथील शेतकऱ्यांनी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांची भेट घेऊन सदर घटनेसंदर्भात माहिती दिली,त्याअनुषंगाने तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले,त्यावर आपण सदर प्रकरणात चौकशी करून योग्य कार्यवाही करू असे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले.यावेळी नारंडा उपसरपंच अनिल शेंडे,  तंटामुक्ती अध्यक्ष दिपक मोहूर्ले,सत्यवान चामाटे, प्रवीण हेपट, तुळशीराम पाटील भोंगळे,नामदेव घुगुल,मारोती शेंडे,साईनाथ भोंगळे,अंकुश वांढरे,बाळा गाडगे,विठ्ठल भोंगळे,मारोती खामनकर,रमेश हस्तक आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.