राखी कंचर्लावार महापौर, राहुल पावडेंची उपमहापौर - 2नगरसेवकांची निवड मतदानाला अनुपस्थिती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राखी कंचर्लावार महापौर, राहुल पावडेंची उपमहापौर - 2नगरसेवकांची निवड मतदानाला अनुपस्थिती

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौरपदी  काँग्रेसच्या उमेदवारांचा  22मतांनी करत  पराभव करत भाजपच्या राखी कंचर्लावार व  उपमहापौर पदी राहुल पावडे विजयी झाले आहेत.


पेंच प्रकल्पातून वारी करत भाजपचे सर्व  नगरसेवक थेट 11 वाजता महानगर पालिकेत उपस्थित झाले होते. कंचर्लावार व पावडे या  यांना 42 तर कल्पना लहामगे व  अशोक नागपुरे यांना 22 मतं मिळाली. 

एकूण 66 पैकी तर भाजपचे दोन सदस्य अनिल फुलझेले व कल्पना बगूळकर अनुपस्थित होते.

उपमहापौर पदी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी अनिल रामटेके, दीपक जयस्वाल, सचिन भोयर, प्रशांत दानव यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर भाजपच्या राहुल पावडे यांची वर्णी लागली असून त्यांच्या या निवडीने रिक्त झालेल्या  स्थायी समिती सभापती पदी कुणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले असलेले तरीही रवी आसवानी यांचे नाव जावपास निश्चित असल्याचे माहितीत आहे.  सलग चौथ्यांदा चंद्रपूर महापौरपदी महिलेची निवड झाली आहे.